पुण्यात पहिल्यांदा आलो तेव्हा ग्रिव्हज गरुडाबद्दल भयंकर आकर्षण वाटायचे. बाहेर जाताना ती रिक्षा मिळावी असे नेहमी वाटायचे. पुढे गरुडा चालवणारे रिक्षावाले काका मिळाले आणि माझी हौस पूर्ण झाली. पण लवकरच तिचे आकर्षण कमी झाले कारण ही रिक्षा खूप त्रास देत असे. एकदा परीक्षेला जाताना तिने माझ्या तोंडचे पाणी पळवले होते.
दुसरी आठवण म्हणजे पीएमटीच्या त्या तसल्या टोकदार बसमध्ये देखील मला बरेच दिवस बसायला मिळाले नव्हते.