प्रतिसादा बद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. तीन चाक्या आपल्याला अनेकदा उपयोगी पडल्या आहेत. पण आजच्या घडीला खास करून चालकांच्या मानसिकतेमुळे वाहतुकीचे गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत. सरकार सीएनजी-एलपीजीची सक्ती करत आहे. पण त्याचा योग्य तो पुरवठा होत नाही. एलपीजीच्या अवैध वापरामुळे अनेक धोके देखील पाहायला मिळतात. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक हल्ली चार चाकी मधून होवू लागली आहे.

रस्ते आणि वाहतुकीचा समतोल राखायचा असेल तर कमी वेगाने आणि बेशिस्तपणे धावणाऱ्या या रिक्षांना, त्यांच्या वजन वाहून नेणाऱ्या वाहन प्रकारांना बंदी करणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करणे असे काही उपाय आहेत. पण जर ३ चाकी बंद केल्या तर लाखो लोकांचा/कुटुंबांचा देखील उपजीविकेचा प्रश्न मोठा आहे. या समस्येवर कायम स्वरुपी आणि तातडीने तोडगा काढणे आवश्यक बनले आहे.