तज्ज्ञ मनोगतींनी जिज्ञासापूर्ती करावी.                                                                                      मी तज्ज्ञ निश्चितच नाही तरीही उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो.

हा मतदारसंघ म्हणजे नक्की काय ?                                                                                  विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहातील सदस्य (महाराष्ट्रात विधान परिषद) हे समाजातील विविध स्थरातून यावेत अशी अपेक्षा असते. त्यांचासाठी जे विविध मतदार संघ स्थापन करण्यात आले आहेत त्यापैकी काही म्हणजे हे पदवीधर मतदार संघ, शिक्षक मतदार संघ इ. उदा. मुंबई पदवीधर मतदार संघात, मुंबईत राहत असलेले सर्व पदवीधर मतदान करू शकतात.

या मतदारसंघाशी संबंधित निवडणुका किती वर्षांनी होतात ?
विधान परिषद सदस्याची मुदत सहा वर्षांची असते.

त्याची नागरिकशास्त्राच्या पुस्तकात माहिती असते का ?
आमच्यावेळीतरी होती!

या मतदारसंघात सामील होण्यासाठी कोणती अर्हता आवश्यक आहे ?
उत्तर वर दिलेले आहे.

या मतदारसंघाने निवडून दिलेल्या आमदारांना कोणते अधिकार असतात ?
आमदाराला जे अधिकार असतात तेच अधिकार.

या आमदारांचा राज्याच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत सहभाग असतो का ? पर्यायाने, राज्याच्या विकासात यांचा वाटा असतो का ?
सहभाग घेण्यावर अवलंबून असतो! प्रमोद नवलकर अनेक वर्षे मुंबई पदवीधर मतदार संघातूनच विधान परिषदेवर आमदार म्हणून (काही काळ मंत्री म्हणूनदेखील होते). त्यांचा सहभाग सर्वांना ठाऊक आहेच.

(पदवीधर) सुनील