कोणतीही भाषा लोप पावणे हे क्लेशकारकच! कारण केवळ भाषाच नव्हे तर एक संस्कृतीही त्याबरोबर लोप पावत असते. जगातील येत्या दोनशे वर्षात लोप पावू शकणाऱ्या भाषांची यादी बहुधा युनेस्कोने बनवली आहे. कुणाकडे असल्यास येथे द्यावी. त्या यादीत उर्दूचा समावेश बहुधा नसावा कारण निव्वळ भारतातच त्यांची लोकसंख्या चार कोटींपेक्षा जास्त आहे. एवढा मोठा भाषक समुदाय एकाएकी दुसरी कुठली तरी भाषा स्वीकारेल असे वाटत नाही.

असे मानले जाते की राज्यकर्त्यांची फारशी आणि सामान्य जनतेची हिंदी यांच्या मिश्रणातून उर्दू जन्माला आली. उर्दूचे व्याकरण आणि प्राथमिक शब्दसंपत्ती ही हिंदीचीच आहे. उच्चस्तरीय शब्दासाठी मात्र उर्दू भाषक फारशीजन्य (क्वचित अरबीजन्य) शब्द वापरतात.

बाकी उर्दूतील सौदर्यस्थळांबाबात अधिक माहिती पुरविण्यासाठी आपल्याकडे (मनोगतावर) तज्ज्ञ आहेतच!

(उर्दू निरक्षर) सुनील