जिंकूनही पुन्हा हरू कसे मी आता?
तू जिंकशील हे करू कसे मी आता?

होकार तू असा दिलास इतक्या लवकर...
स्वप्नांत सांग वावरू कसे मी आता?
हे दोन सफाईदार शेर फार आवडले. आकाशवेडही चांगले आहे. एकंदर गझल आवडली.


होकार तू कसा दिलास इतक्या लवकर असेही वाचले. जुना ऋणानुबंध या मातीशी...ही ओळ सोडल्यास वाचताना खटकले नाही.