सोनार साहेब, ह्या सॅटायर (शालजोडीतले?) वरून आपल्याला हे लक्षात येईल की जर सरकारने समाजाच्या अभिव्यक्तीवर विनाकारण बंधने घातली तर भारताच्या लोकनियुक्त शासनामध्ये आणि तालीबान मध्ये काहीच फकर उरणार नाही. बॉलीवूड हा एक व्यवसाय आहे. येथील निर्माते समाजसुधारणेचे ध्येय घेऊन चित्रपट निर्मिती करीत नाहीत, तर समाजाची करमणूक करून त्यातून अर्थार्जन करणे हा त्यांचा प्रामाणिक आणि स्वच्छ हेतू आहे. आणि मला त्यात काही गैर वाटत नाही. बॉलीवूडने वाहवत जाउन अश्लील किंवा समाजविघातकी चित्रपट काढू नयेत एवढेच सेन्सॉर बोर्डाचे काम आहे. नितीमत्ता पोलीस (मॉरल पोलीस) होऊन समाजाची नितीमत्ता सुघारणे हे त्यांचे काम नाही.