शब्दबंबाळ लिहीणारे बरेच लोक, केवळ आपले भाषाप्रभुत्व दाखवण्याकरता अनेक जड (आणि काही वेळा चुकीचे) शब्द वापरतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे 'लोकमत' या ऑनलाईन दैनिकात काही महिन्यांपूर्वी छापून आलेले एका काव्यसंग्रहाचे रसग्रहण. मी ती लिंक शोधून इथे द्यायचा प्रयत्न करेन. खेरीज, द.मां. नी त्यांच्या एका लेखात वरील प्रकारची उदाहरणे दिलेली आहेत, त्याचाही संदर्भ द्यायचा मी प्रयत्न करेन.

ज्या ठिकाणी एखादा 'सुसंस्कृत आणि परिपक्व' शब्द, आपणास पाहिजे असलेल्या अर्थछटेच्या जास्तीत जास्त जवळ जात असेल, त्या ठिकाणी तो खुशाल वापरावा, पण तसे काही कारण नसेल तर जड शब्दांची योजना केवळ करायची म्हणून करु नये असे मला वाटते, इतकेच!