एकांगी चर्चाप्रस्तावाला चांगला संतुलित प्रतिसाद.

चर्चाप्रस्तावातले भारतीय शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सवलतींवरचे भाष्य अज्ञानमूलक आहे. भारतातल्या शेतकऱ्यांना युरोपीय किंवा अमेरिकन शेतकऱ्यांपेक्षा कितीतरी कमी सवलती मिळतात. युरोपीय संघ आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने तिथल्या शेतकऱ्यांना किती जास्त सवलती, सबसिड्या देतात हे जरा तपासून बघावे. उदाहरणार्थ: युरोपीय संघाच्या संयुक्त बजेटचा(जॉइंट बजेट) ४० टक्के हिस्सा सबसिड्यांवर खर्च होतो. ही रक्कम ५० बिलियन डॉलरपेक्षा अधिक असलेल्या ह्या सबसिड्यांचा फायदा इंग्लडच्या राणीसारख्या मोठ्या शेतकऱ्यांना होतो आणि २.२ टक्के लोकांत ६० टक्के सबसिडी संपते. युरोपातल्या गायी ह्या आफ्रिकेतल्या आणि आशियातील गरीबांपेक्षा कितीतरी सुदैवी आहेत. प्रत्येक युरोपीय गायीला जवळपास २ डॉलरची सबसिडी दररोज मिळते, वर्षभर मिळते. आफ्रिकेतल्या आणि आशियातली किती गरीब राष्ट्रांत किती जणांना एवढा  रोजगार वर्षभर मिळतो? असो. तूर्तास एवढेच.

मुद्याला सोडून केलेले 'गांधीजींच्या भोंगळ कल्पना' सारखे फोलकट आणि विशिष्ट विचारसरणीच्या ठरवून गांधीद्वेष करणाऱ्या ठरावीक वाचकांकडून टाळ्याघेऊ शकणारे शब्दप्रयोग  चर्चाप्रस्तावाचे गांभीर्य करतात असे मला वाटते.