मत्स्यगंधेने शंतनूशी विवाह करतांना, केवळ तिच्याच पुत्रास राज्य मिळावे म्हणून भीष्मास आजन्म ब्रह्मचर्यपालनाची प्रतिज्ञा करायला भाग पाडले होते. पुढे सुनांना मूल होण्याची शक्यता मावळताच तिला त्याच भीष्मांना, सुनांना मूल व्हावे म्हणून त्यांच्याशी रत होण्याची विनंती करावी लागली होती. ह्यापरता काव्यात्मक न्याय आणखी कोणता असू शकेल?