पण माझा एक मुद्दा सांगायचा राहून गेला की मॅटिनी आणि इव्हिनींगला असे विषय यायला लागलेत .... किशोरवयीन / कुमारवयीन मुले आपल्या आई वडिलांना विचारून प्रत्येक वेळेस चित्रपट बघायला जाणार नाहीत. त्यांच्यावर जर सतत सगळीकडून अशा प्रकारच्या कथा असलेल्या चित्रपटांचा मारा होत राहीला तर कशावरून त्यांना ते खरे वाटायला लागणार नाही?

जाहीरातीचे उदाहरण घ्या! सतत तीच तीच जाहिरात बघून ते खरे वाटायला लागते. हाच तर जाहिरात वाल्यांचा हुकुमी एक्का असतो. सतत तोच तोच मारा....

काय बघायचे , काय नाही हे ठरवणे जरी आपल्या हातात असले तरी, कोवळे वय (९ ते १४ ) असतांना असे चित्रपट ( मॉर्निंग चा विषय मॅटिनी ला असणारे ) बघून कळत- नकळत त्यांच्या मनावर थोडा का होईना परिणाम होईलच असे मला वाटते. अर्थात हा माझा दृष्टिकोन आहे.... प्रत्येकाचे शेवटी मत वेगळेवेगळे असणार!

आणि टि.व्ही. वर जाणून बुजून फायर सारखा चित्रपट दिवसा दाखवला जातो. ....

एनीवेज, ते जावू द्या!.....