मेरी टॉडच का तुकाराम पत्नीही अशीच खाष्ट होती (निदान संत तुकाराम चित्रपटातील) असा जनप्रवाद आहे.... चू. भू. दे. घे.
असो.
मेरी टॉड ही त्याकाळातील सधन घरातून येणारी शिकली सवरलेली बाई होती. राजकारणात तिला रूची होती. कदाचित तिची महत्त्वाकांक्षा कोठेतरी अपूर्ण राहीली का काय कोणास ठाऊक पण ती तऱ्हेवाईक आणि खाष्ट होती हे खरेच. कारण दुसऱ्याला विनाकारण दुखावणे, खाष्टपणा करणे तसेच आदळआपट, मोठ्याने आरडाओरडा हे असंतुष्ट माणसाचे लक्षण वाटते. या असंतुष्टपणात तिचे अब्राहमवरील प्रेम झाकले गेले असावे.
बाकी,
ती अनेकप्रकारे लिंकनला छळत असे. त्याच्या वागण्या-बोलण्यातले दोष दाखवून त्याला हिणवत असे. माणसाने कसे ताठ, छाती पुढे काढून चालावे, चालीत जोश, शान असावी, असे ज्ञान ती लिंकनसमोर पाजळत असे. तुझे कान फताडे आहेत, नाक वाकडं आहे. तू ताड-माड आहे. तुझं डोकं फार लहान दिसतं-एखाद्या लांब काठीवर लहान भांडं ठेवल्यासारखं वाटतं, अशा बोचणाऱ्या शाब्दिक टपल्याही ती मारत असे.
कोणाला असं बोलून दुखवू नये, अगदी स्वर्गस्थ लिंकनलाही पण मेरी भयंकर स्पष्टवक्ती असावी आणि तिचा पावित्रा अयोग्य असला तरी तिच्या म्हणण्यात मला एकही त्रुटी दिसत नाही. पण लिंकनच्या दिसण्याने मला फरक पडत नाही, इतरांनाही पडला/ पडत नसावा पण बायको म्हणून कदाचित तिला पडला असावा.