वडुलेकरसाहेब नमस्कार,
अपकाराची फेड उपकाराने करणे किंवा दुर्वर्तनास दुर्लक्षून उपकार करणे म्हणजे "काव्यात्मक न्याय" नव्हे.
काव्यात्मक न्याय दिला जात नाही. तो नैसर्गिगरीत्या अपराध्याला आपोआपच मिळत असतो.
त्याच्या करणीला साजेसा, निसर्गानेच दिलेला म्हणून काव्यात्मक. कवितेला स्फुरण देऊ शकेल असा!
मत्स्यगंधेच्या उदाहरणात भीष्मांना कधीही न्याय मिळालेला नाही.
नैसर्गिक न्याय सत्यवतीला सोसावा लागला. तो खचितच काव्यात्मक होता.
एवढा की, भीष्मांनी स्वतःवरील अन्याय दूर करण्यासाठी काहीही न करता देखील
सत्यवतीला त्यांना नियोगाची गळ घालून जणू आपल्या कृत्याचे परिमार्जन करण्याचा प्रसंग प्राप्त झाला.
शेवटी तिला हेही म्हणावे लागले की "अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा!"
मात्र जीवनाचा कलह अर्थशून्य नव्हता, तर तिने भरपूर अन्याय भीष्मांवर करूनही,
तिला तो कलह स्वतःच्या सोयीस्कर पर्यवसायी करून घेता आलेला नव्हता. म्हणून निरर्थक वाटत होता.
युवराजला एका सामन्यात षटकात पाच षटकार सोसावे लागल्यावर त्याने
पुढे दुसऱ्या एका सामन्यात सहा षटकार खेचले. मला वाटते की हा काही काव्यात्मक न्याय नव्हे.