संतोष पवार ह्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. संतोष पवारांची आणि त्यांच्या कवितेची ओळख करून दिल्याबद्दल आपले आभार.  "...अस्वस्थता म्हणजे माझी कविता" हे आवडले. फुटाण्यांच्या  आणि फुटाणछाप कवितेबद्दल त्यांनी मांडलेले मतही.

'अभिधा, 'अभिधानंतर' आणि पूर्वीच्या पण त्याच भावकीतल्या कवितांत ड्रामेबाजी, स्टंटबाजी, भाषण, शाब्दिक चमत्कृतीच जास्त आढळते, असे मला वाटते. ह्या कवींच्या कविता पाच-पन्नास लोकांपर्यंत पोचत नाहीत तोच हे समीक्षकांनी मोठे केलेले कवी शतकातले महत्त्वाचे कवी होऊन बसतात. सामान्य जनतेनेच कविता स्वीकारल्या नाहीत तर ह्यांच्या वैश्विकतेला अर्थ काय? तसेच माध्यमांशी संपर्क ठेवण्याची हौस, प्रसिद्धीचा हव्यास ह्या तथाकथित अभिजनांनी पोसलेल्या 'लिटिल' कवींना मुळीच नसतो काय?