आमच्या प्राथमिक शाळेच्या (नूतन मराठी विद्यालय) मोहर ह्या वार्षिक अंकाचा एक विशेषांक केवळ क्रांतिकारकांवर काढलेला होता. त्यातले सर्व लेखन (माझ्या माहितीप्रमाणे) प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांनीच केलेले होते. मुखपृष्ठावर वासुदेव बळवंत फडक्यांचे चित्र दिलेले होते.

माध्यमिक शाळेत (नूमवि प्रशाला) आम्ही नववीत असताना आमच्या वर्गात एका स्वातंत्र्यदिनी वर्गाची सजावट क्रांतिकारकांच्या चित्रांनी आणि माहितीने केलेली होती (विद्यार्थ्यांनीच) ती सर्व चित्रे विद्यार्थ्यांनीच काढलेली होती. (मी भगतसिंगांचे चित्र काढले होते.)

ह्या दोन घटनांची आठवण ह्या लेखामुळे झाली.

धन्यवाद.