धन्यवाद तिघांनाही.
आणखी चर्चेसाठी काही मुद्दे
1.मुदत - मुदत सहा वर्षांसाठी का ? पाच वर्षांसाठी का नाही ?
2.ओळख - नवलकर यांच्यासाऱखे अपवाद वगळता हे आमदार विधानसभेच्या आमदारांइतके (!)काम करताना दिसत नाहीत. अधिकार दोन्हीकडच्या आमदारांना समान आहे. पण विधानपरिषदेचे आमदार  फारसे चर्चेत नसतात. पर्यायाने, त्यांच्यावर आरोप होताना दिसत नाहीत, त्यांचे कौतुकही होताना दिसत नाही. अज्ञातवासात असल्यासारखे वावरत असतात. विधानसभेचा आमदार रस्त्यावरून जाताना दिसला तर त्याला किमान काही जण ओळखतील पण विधानपरिषदेचा आमदार रस्त्यावरून जात असेल तर ओळखला जाईल, याची खात्री नाही.
4. स्थान -विधान परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार मोठ्या प्रमाणावर झालेला दिसत नाही. जनतेतही विधानसभेच्या निवडणुकीची चर्चा अधिक होताना दिसते. गप्पा रंगतात. पण 'विधानपरिषदेत यावेळी तिरंगी लढत आहे', 'आत्ताच विधानपरिषदेसाठी मतदान करून आलो', असे म्हणताना कोणीही दिसत नाही. विधानपरिषदेसाठी केवळ पदवीधर मतदान करू शकतात. इतर निवडणुकांसाठी अठरा वर्षे वयावरील कोणीही मतदान करू शकते. म्हणजे, महत्व विधानपरिषदेला आहे. तरीही, एकूण विधानपरिषदेबाबत उदासीन वातावरण असल्याचे चित्र आहे.
असे का ?

कृपया जिज्ञासापूर्ती करावी.