लिहिणार्याचा कुठे का दोष असतो?
वाचकालाच दूषण द्यावे आपण...
इतरांसाठी थोडे आपण लिहितो?
मनी येईल ते खरडावे आपण...
असेल चुकले कधी कधी अपुले पण
मान्य कशाला ते करावे आपण?...
'केश्या' मेल्या तुला कसे ना कळते
किती जगाला इथे छळावे आपण...
ह्या ओळी भिडल्या.
एकंदर चांगले विडंबन आहे. अगदी आवडले. आपण घाईत वृत्त पाळायलाच हवे असे नाही कारण मुळात आपला तो पिंडच नाही
काव्य कशाला स्वतः करावे आपण?
आयत्या जमीनींनाच कसावे आपण...
कुणी जरी प्रतिसाद टाकले नाही;
विडंबनांना पाडत जावे आपण...
लिहिणार्याचा दोष कधी का असतो?
पढणाऱ्याला दूषण द्यावे आपण...
इतरांसाठी थोडे आपण लिहितो?
मनात येइल ते खरडावे आपण...
असेल चुकले कधी कधी अपुले पण
ते मान्य कशाला मुळी करावे आपण?...
'केश्या' मेल्या तुला कसे ना कळते
किती जगाला इथे छळावे आपण...