मी या ठिकाणी व्याकरणाबद्दल बोलत नसून अर्थाबद्दल बोलत आहे. अंगात शर्ट घालणे हा प्रयोग अर्थाच्या दृष्टीने चुकीचा आहे. आपण काही आपले अंग उघडून त्यात शर्ट कोंबत नाही, तर शर्ट उघडून मग त्यात आपले अंग घालतो, त्यामुळे शर्टात अंग घातले असेच म्हणणे बरोबर आहे.