मला या अमेरिकन फुटबॉल मधले काहीच माहिती नाही. या रेषेचा उपयोग काय असतो? कोणत्या नियमांसाठी ती वापरली जाते? आणि ती कधी दाखवली जाते? गुगलून उत्तर मिळते का  बघायला हवे!

सौरभ,

नुसतेच गुगलून माहिती मिळवण्यावर समाधान मानू नका. मिळालेली माहिती येथे मराठीत लिहिलीत तर कित्येकांना वाचायलाआवडेल (मला सुद्धा. मला तरी खेळातले कोठे काय समजते )

पिवळी रेघच नाही, तर समालोचन चालू असताना कित्येक प्रकारच्या स्पष्टीकारक खाणाखुणा दाखवल्या जातात. (मलाही अमेरिकी फूटबॉल फार समजत नाही. परवा सूपरबॉल असल्याने ताज्या ताज्या जाहिराती, गाणी असे अनेक मनोरंजक भागअसल्याने खेळाची आवड/माहिती नसलेले कित्येक जण टीव्हीला चिकटून बसलेले असतात, त्यातलाच मीहीएक होतो.)

अशा खाणाखुणा हॉकी, क्रिकेट अशा कुठल्याही खेळात दाखवता येणे शक्य आहे.