याला काय म्हणावे? माझी मती कुंठीत झाली आहे या वाक्याने. एखाद्याचा घास काढून घेऊन त्याला वाऱ्यावर सोडून इतर चार जणांना तो भरवून त्याला प्रगती किंवा विकास म्हणायचा असेल तर म्हणा. पण मी हे कदापि स्वीकारू शकत नाही (याला ठेविले अनंत तैसेची रहावे वृत्ती म्हणा हवी तर... पण ती अधिक नैतिक आहे - अर्थात अर्थशास्त्रात नीतीमत्ता नावाच्या गोष्टीला काही स्थान असेल तरच माझे हे मत ग्राह्य ठरेल अन्यथा नाही).



कमालच आहे तुमची... जर हे तुमचे मत असेल तर मूठभर संघटीत कामगार जेव्हा कोट्यावधी लोकांच्या फायद्याच्या योजना आमलात आणायला आडकाठी करतात ते ही तुम्हाला चालेल ना... कारण ते जास्त नैतिक आहे नाही का? समाजवादाचा हाच तर दुर्गुण आहे... १०० पैकी ५ लोकांना जर एखादी गोष्ट मिळणार नसेल तर इतर ९५ लोकांनाही त्यापासून वंचित ठेवायचं? हा कुठला न्याय? ही कुठली नितीमत्ता? ह्याच न्यायाने जोपर्यंत देशातील सर्व जनतेला सकस आणि पुरेसे अन्न मिळत नाही तोपर्यंत सर्व पक्वांन्नांवरही बंदी घालण्यासारखं आहे, पटतंय का?