अमितराव

टाकं हा विशेषतः ट्रेकर्समध्ये लोकप्रिय शब्द आहे.

`लोकं' पण असाच भयानक शब्द...कबूल!

तो विशेषतः मुंबईतील मराठी- हिंदी चा प्रभाव आहे.

`ते लोक निघालेत' असं म्हटलं जातं सहजपणे.

`ते सगळे निघालेत' म्हणणं अपेक्षित असतं.

असो.

दोष काढण्याचा हेतू नाही. सहज गम्मत.

आता, खानदेश-विदर्भात नाही का,

`चालला गेला' वगैरे म्हणतात.

`परेशान', `भिन' असेच काही शब्द. त्या त्या भागाची खासियत, किंवा प्रभाव.

तिकडे `मागे' किंवा `आत' या अर्थी `मधे' शब्द वापरतात. `तो मधे गेलाय' म्हणजे, आत गेलाय, असं समजायचं.