मी अजून एक पुस्तक, बहुधा त्याचे नाव "महाभारतातील गूढे", ले. पं. कवीश्वर, वाचले होते. त्यात महाभारतातील युद्धाचा काळ, गणित-शास्त्रीय पद्धतीने काढला आहे. आणि त्यांनी असेही म्हटलेआहे की कवीने त्याच्या काळाप्रमाणे ग्रह ताऱ्यांच्या स्थिती वर्णिल्या आहेत.
त्यानी असेही दाखवले आहे की युद्ध अठरा दिवस पण प्रत्येक दिवसानंतर एक दिवस विश्रांतीचा असे धरून पस्तीस दिवस चालू होते. अपवाद फक्त जयद्रथ वधाच्या संध्याकाळचा. त्या रात्रीही युद्ध झाले.
त्या पुस्तकात इतरही अनेक गोष्टींचा उलगडा करायचा प्रयत्न केला आहे.
वरील चर्चा वाचून त्या पुस्तकाची आठवण झाली.