कधी सिंव्हाचा सिंह केला ते कळलेच नाही.  वरील लेख वाचून लक्षात आले.  नशिब अजून कौंसाला कंस म्हणत नाही.. 

मी सुद्धा शुद्ध मराठी आणि व्याकरणाचा आग्रह धरते, वेळप्रसंगी भांडलेही आहे.  तरीही हल्ली 'मी तिथेच पुटलेय' ,  'तु जरा लिसनशील का?',  'पुस्तके चेंजून आणायचीत' वगैरे खुप व्हायला लागलेय (आणि कोणीतरी दुसरे लक्षात आणून देते तेव्हा कळते आपण काय बोललो ते).   घरात/बाहेर मराठीतच बोलते,  मराठी वाचनही करते (म्हणजे दिवाळी अंक, मासिके,  सरकारी ग्रंथालयातील पुस्तके वगैरे).  तरीही अशी ही विचित्र भाषा का तोंडी येते कळत नाही.

साधना

(लेख नक्कीच विचारप्रवृत्त करणारा आहे)