लिहिण्याची कल्पना चांगली वाटली पण वर उल्लेख केलेले बरेच शब्द/वाक्प्रचार तथाकथित हाडाचे पुणेकर आजही वापरीत नाहीत असे नमूद करावेसे वाटते.
"तुम्ही येणार आहे काय?" हे वाक्य पुण्यात वापरले जाते हे ऐकून जबर धक्का बसला आहे.
बाकी टाकं हा शब्द पूर्वीपासून प्रचारात असावा असं वाटतं. कदाचित जी लहान असते ती पाण्याची टाकी आणि एखाद्या देवळाजवळ वगरे जो जलाशय / तळं / तलाव थोडक्यात म्हणजे पाण्याचा मोठा साठा असतो त्याला टाकं म्हणतात असे वाचल्याचे स्मरते. चू भू दे घे.
तथाकथित (म्ह. हापिसातून दमून आल्यावर पोहे खाणारे आणि संध्याकाळी पर्वतीला जाऊन रात्री पावणेदहाला गडप होणारे हाडाचे ) पुणेकर आजकाल औषधाला तरी सापडतील की नाही अशी शंका वाटते. पण मारलेल्या कोपरखळ्या (कोपरखळ्याच असतील अशी आशा करते....) तितक्याश्या पटल्या नाहीत. सध्या तर पुणेकर आणि पुणेरी पाट्या या गोष्टींना हसायचं पेव सर्वत्र फुटलेलं आहे असं वाटतंय. आमच्यावर केलेल्या विनोदाला आम्ही पुणेकर जसून दाद देतो तरीपण ही खेचाखेची हल्ली जरा जास्तच होते आहे की काय असंही वाटायला लागलंय.
एकूण लेख वाचून कुणाच्याही डोक्यावरचे केसबिस उपटावेत इतका वैताग का यावा हे कळले नाही.
--अदिती