रोज डोळ्यांतून वाती
आसवे लावून जाती ...सुंदर
पाकळी घायाळ येथे
डोलती डौलात पाती ...सुंदर
शेवटी येती कधी का
सोबतीला सांग नाती ...काय भाष्य आहे? वा!!!
ना जमा ना खर्च काही
मोकळी सारीच खाती ...ही द्विपदी ठीक; पण मूड बदलला.
काल सांगावा मिळाला
तार आली आज हाती ...ही द्विपदी ठीक; पण मूड बदलला.
शेवटच्या दोन द्विपदी तशा बसतीलही; पण मूड बदलला असे वाटतेच. मध्येच विडंबनाचा मूड आला होता की काय, असा प्रश्न पडला. एकाद्या विडंबनात त्या `सुंदर' ठरल्या असत्या.