टाकी मानवनिर्मित असते आणि टाके (टाकं) नैसर्गिक असा काहीसा भेद केला जात असावा असे वाटते.

गच्चीवर असते ती टाकी. सिंहगडावर आहे ते देव'टाके' (देवटाके हा शब्द शाळेत प्रथम ऐकल्यावर तो 'तटाक' ह्या शब्दावरून आला आहे की काय असेही मला वाटले होते! 'तया वनी एक तटाक तोये - तुडुंबले तामरसानपाये' ही ओळही त्याच सुमारास ऐकण्याचा परिणाम असावा.)

अर्थात हा सगळा माझा कल्पनाविलास आहे. संदर्भग्रंथांचा आधार नाही.