एवढा का संतापलास बरे?
जरा लिखाणाची इश्टाइल जपायची, म्हणून अतिशयोक्ती अलंकार वापरला, झाले!
पण भावना मात्र चुकीची नाही, बरे!
असो.
मी पुण्यात राहतो, म्हणून आणि पुणे हे विद्येचे माहेरघर आहे म्हणून इथली उदाहरणे दिली, झालं. पुण्यात शुद्ध बोलणारे लोकही पुष्कळ आहेत. पण `अशुद्ध' हा लेखाचा विषय आहे ना, म्हणून. एक गंमत, एवढंच. मी काय कुणाला फासावर द्या, असं कुठे म्हणतोय? त्या-त्या ठिकाणाचा, भाषेचा, संस्कृतीचा प्रभाव असतो माणसावर.
साताऱ्याचे लोक `पायजेल' म्हणतात, तर कोकणी लोक केलंन् , खाल्लन् म्हणतात. असो.
पण `सिंहगड' पटत नाही, हे मात्र निश्चित!
चूक-भूल घेणे.
- अभिजित.