कवितेतील शृंगाररसाला नाके मुरडणे जितके चूक तितकेच त्यांच्या कवितेतील केवळ शृंगाररसाचा आस्वाद घेणे अयोग्य होय.
अगदी!! महानोरांच्या आशयगर्भ (म्हणजे लय भारी :) ) कवितेचा फार छान आस्वाद घेतला आहे.
'हासतांना नभ कलून गेलेले' ह्या ओळीतही अनेक अर्थ दडलेले, अनेक पदर असावेत. केवळ दिवस कलण्याकडे इशारा नसावा. कदाचित भेटी मुळे एवढा आनंद झाला असावा की तिच्या डोळ्यांतले नभ कलून गेल्यासारखे किंवा कुठलीशी चिंता तिला सतावत असल्यासारखे कवीला वाटले असावे. असो. असे मला तरी वाटले. तसेच एकंदर महानोरांच्या कवितेत 'ज्वार' आणि 'स्त्री' समागमे येताना दिसतात. चूक भूल देणे घेणे.
एकंदर लिखाण आवडले. पुढील लिखाणासाठी शुभेच्छा!