अमिबानी दिलेली माहिती सविस्तर आहेच. त्यात आणखी एक भर घालू इच्छितो.

आता तुमचा ब्लॉग सुप्रसिद्ध कसा करायचा आणि तुमच्या ब्लॉगकडे अधिकाधिक लोक कसे वळतील हे बघू.
ह्यात लिहिल्याप्रमाणे इतरांशी देवाणघेवाण पाहिजेच.
तसेच काही संकेतस्थळे ब्लॉगची नोंदणी करून तिथे सर्व सभासदांच्या ब्लॉगची नावे व नवीन लिहिलेले ब्लॉगमधील थोडे लिखाण ही दाखवते.(मनोगताच्या मुखपृष्ठावर डाव्या बाजुला असल्याप्रमाणे). असेच एक मराठी संकेतस्थळ येथे http://www.marathiblogs.net/ आहे. आणखी ही बरीच आहेत. त्यामुळे तुमचे लिखाण (ब्लॉग) प्रसिद्ध होताच ते अशा संकेतस्थळावरही अद्याव्त होऊन जास्त लोकांना त्याची माहिती मिळू शकते.

एका ठिकाणी वाचल्याप्रमाणे, आपले लिखाण असे असावे की ते (लोक) तुमच्या(लिखाणा)वर प्रेम करतील किंवा तिरस्कार करतील पण ते दुर्लक्ष करू शकत नाहीत.
मी ही त्याच प्रयत्नात आहे पण पुरते साध्य झाले नाही अजून.

(प्रशासकांसः आज दुवा देण्याकरीता नीट जमले नाही. त्यामुळे रोमन अक्षरे राहिलीत.)