मराठी वृत्तपत्रांत सुद्धा राज जे बोलला नाही ते छापून येते आहे. आजच्या सकाळ-लोकसत्तात वाचा. राज बरोबर, पण त्याचा मार्ग चुकीचा, राज मुंबईत उत्तर भारतीयांना प्रवेश नाकारू शकत नाहीत. प्रत्येकाला आपली संस्कृती कुठल्याही प्रांतात जपण्याचा अधिकार राज नाकारू शकत नाही. अमिताभच्या बंगल्यावर हल्ला(?) व्हायला नको होता. अमिताभने महाराष्ट्रासाठी खूप (म्हणजे सिनेमे?) केले आहे. राज ठाकरेचे लोक उत्तर भारतीयांना ठोकतात. मुंबई अशांत(?) आहे.
ज्या टॅक्सीड्रायव्हरला मारले त्याच्या गाडीतली कोयताधारी माणसे आणि काठ्यांचा साठा फक्त एकदाच टीव्हीवर दिसला, नंतरच्या बातम्यांतून तो शॉट गाळला.
आणखी भरपूर चुकीचे छापून येते आहे. आज एनडीटीव्हीवर अशा चुकीच्या मुद्द्यांवर भरपूर चर्चा झाली. त्यातले एक विधान असेः राज मुंबईत उत्तर भारतीय कायदा पाळत नाही असे बोलला, म्हणून दिल्लीचे उपराज्यपाल तसे म्हणाले. राज बोलला नसता तर तेसुद्धा बोलले नसते! घ्या!!