त्यांना खोट्या बातम्याच द्यायच्या आहेत

हेच म्हणतो.

'राष्ट्रीय' वाहिनीच्या बुरख्याखाली फक्त हिंदीचे आणि हिंदीप्रेमाचे तुणतुणे वाजवणे. सर्व अमराठी लोकांनी - मराठी माणसाबद्दल काडीचेही प्रेम नसणाऱ्या -  सुमार केतकरांना नावापुरते बरोबर घेऊन फक्त मराठी माणसांचेच इथे कसे चुकत आहे हे सारखेसारखे अधोरेखित करत राहणे. प्रश्न विचारल्यानंतर उत्तर ऐकून घेण्याची तसदीही न घेता 'तुम्हाला हेच म्हणायचे असेल.. हो तुम्ही हेच म्हणालात. हेच आहे ते.दुसरे काय?' असे आक्रमक आणि आक्रस्ताळी वर्तन करणे हे अतिशय संतापजनक आहे. आयबीएन सारख्या इंग्लिश वाहिनीवर इंग्रजीत विचारलेल्या प्रश्नाला संजय निरुपम यांनी हिंदीतून उत्तरे दिली तर ते सर्वसमावेशक मात्र शिरीष पारकरांनी मराठीत उत्तर दिले तर ते संकुचित हा न्याय काही केल्या समजत नाही.

राज ठाकरे यांनी इंग्रजी व हिंदी वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांना न बोलावता पत्रकार परिषद घेतली हे खूपच चांगले केले आहे. किंबहुना दक्षिण भारतातील द हिंदू किंवा डेक्कन हेरॉल्डच्या धर्तीवर महाराष्ट्र केंद्रित इंग्रजी वाहिनी व इंग्रजी वर्तमानपत्रही असणे आवश्यक आहे जे महाराष्ट्रातील इंग्रजी वाचकांना योग्य माहिती देऊ शकेल.

यावर कळस म्हणजे, सीएनएन-आयबीएन ने वृत्तांकन करताना एका वृत्तनिवेदिकेच्या तोंडी, "इव्हन दो आय कॅन टॉक अँड अंडरस्टँड मराठी, आय वाज थ्रोन अवे फ्रॉम द प्रेस कॉंफरन्स" अशी वाक्ये घालून पुढे "मी क्ष क्ष क्ष सीएनएन आयबीएन साठी. मुंबईहून" असे चक्क मराठीत बोलायला लावले. किती हा भंपकपणा.