रघुनाथ पंडित ह्या पंतकवीचे 'नलदमयंतीस्वयंवराख्यान' नावाचे एक (महा?)काव्य आहे. त्यात ही ओळ आहे. (शिवाय 'कठिण समय येता कोण कामास येतो' ही सुप्रसिद्ध ओळही त्याच काव्यातली!) (आ. अत्र्यांनी ह्यावरूनच 'कषायपेयपात्रपतितमक्षिकेप्रत' हे विडंबन लिहिले असावे.)
तामरस = दिवसा उगवणारे (लाल?) कमळ
अनपाये = अविरोध, मध्ये काही अडथळा न आलेले. समृद्ध. अपाय न झालेले
असे अर्थ जालावर मिळाले.
त्यावरून
तया वनी एक तटाक तोये तुडुंबले तामरसानपाये
ह्याचा अर्थ
कमळांनी गच्च भरलेल्या पाण्याने तुंडुंब भरलेले (की कुणी कमळांना हात न लावलेले?) तळे त्या रानात होते. ... असा काहीसा अर्थ घेता येईल.
चू. भू. द्या. घ्या.