घरी मिळतात त्या 'घडीच्या पोळी' किंवा 'फुलके'. त्यामुळे बाहेर उपाहारगृहात मिळते ती 'चपाती', असा माझा समज झाला आहे. पूर्वीच्या काळी गव्हापासून बनविलेली पोळी अगदी सणासुदीलाच करीत असत, असे ऐकले आहे. इतर दिवशी भाकरीच असे. त्यामुळे पोळा हा शब्द साध्या पोळ्यांपासूनही आला असावा.

बहुतेक करून ब्राह्मणांत 'पोळी' हा शब्द अधिक रूढ असावा. अर्थात ह्या गोष्टीला अपवाद असण्याची शक्यता अतिशय दाट आहे. चूक भूल देणे घेणे.