मी कुठलाही आरोप कुणावरही केलेला नाही. गैरसमज नसावा. नातूंच्या प्रतिसादाशी सहमत आहे, एवढेच पुन्हा म्हणेन.
आयटी क्षेत्रात काम करणारे बहुतेक जण कामसू नसतात, नालायक असतात असे मी कुठे म्हटले आहे का? नाही! ज्या गोष्टीचा मी कुठे उल्लेखही केला नव्हता ती गोष्ट तुम्हाला का बरे खटकावी, लागावी. कृपया चुकीचे निष्कर्ष काढून नयेत आणि व्यक्तिगत निरोपातही शब्द सांभाळून वापरावेत ही विनंती.
आयटी मजूर, कामगार कमी दरात उपलब्ध असल्यामुळे ('लेबर आर्बिट्राज'ला मराठीत काय म्हणायचे?) भारतात ह्या क्षेत्राची भरभराट झाली. सध्याची आणि येणारी तेवढी अनुकूल नाही, हे कळल्यामुळे त्यामुळेच टीसीएस आणि इतर काही कंपन्यांनी कामगार कपात करण्याचे ठरवले असावे, हे स्पष्टच आहे.