हिंदी पिक्चर पाहताना तर दरवेळी या संवादांनी आपलं डोकं उठत आलं आहे. ते दोघं एकमेकांशी उसासत, धपापत, (जमल्यास) अंग घुसळत बोलतात. एकमेकांना सूचक हावभाव, संवादांची देवाणघेवाण करतात. पण प्रत्यक्ष निर्णयाची वेळ आली, की मात्र एकमेकांबद्दल "प्रेम' असल्याच्या भावनेनं त्यांना धक्काच बसतो. त्यांची "तसली नजर' तडमडते मध्ये.
अगदी खरोखर असा सीन मी जितेंद्र-रेखाच्या एका पिक्चर मध्ये पाहिला आहे. ते दोघेही एकमेकांबरोबर फिरतात, बागेत एक गाणेही गातात, पुढे रेखाचे लग्न दुसऱ्याशी होते, अर्थातच तो दुसरा नालायक निघतो आणि मग रेखा परत आल्यावर एकदा जितेंद्रला बहुतेक सांगते तीचे लग्नाआधी त्याच्यावर कसे प्रेम होते ते. तो लगेच म्हणतो, ऐसा था तो तुमने कभी इशारा क्यों नही किया? हे ऐकल्यावर माझा जो आ वासला गेला की बस रे बस.. पुढचे तिनचार सीन्स मी पाहुच शकले नाही. बागेत फिरणे, प्रेमाची गाणी गाणे ह्यानंतरही अजून कसला इशारा पाहीजे?
सब बकवास है. "तसली नजर' बिजर काही नाही. अंगाशी आलं की माणसं हात आखडता घेतात. पळवाटा आहेत सगळ्या. खरं बोलायची हिंमत नसते लोकांमध्ये.
हे एकदम खरे आहे.