टीसीएस ने ५०० जणांना काढणे हे नियमित कामगारतपासणीचे फलित होते. विशिष्ट गुणपातळीपर्यंत (पाच पैकी किमान दोन गुण मिळवणे आवश्यक) आपली कामगिरी करू न शकणाऱ्या ५०० जणांना कामावरून काढणे हे कंपनीच्या इतर कर्मचाऱ्यांच्या व समभागधारकांच्या हिताचे आहे. कंपनीला कुठेही धोका नाही असे कंपनीने जाहीर केले आहे. किंबहुना सर्व आयटी कंपन्यांची कामगारभरतीही पूर्वीप्रमाणेच सुरू आहे. मात्र अकार्यक्षम अशी मंडळी फुकटची पोसत बसल्यास कंपनीला धोका निर्माण होईल हे नक्की.
आपली प्रसारमाध्यमे बातमीचे हाडुक मिळवण्यासाठी किती शेपटी हलवतात हे घृणास्पद झाले आहे. मागे आलेली ही बातमी पहा. दुवा क्र. १ बातमीचा मथळा "आयटी क्षेत्रात जोरदार पगारकपात" आणि बातमी काळजीपूर्वक वाचल्यास "क्षेत्रातील पगार स्थिर होत आहेत" असे लिहिले आहे. खरे तर आपल्या प्रसारमाध्यमांसाठी नियामक मंडळ असावे असे वाटते. अभिव्यक्तिस्वातंत्र्य जबाबदारीने वापरावे याची त्यांना अजिबात फिकीर नाही.
वरील मताशी सहमत आहे.
-(सहमत) आजानुकर्ण