'रिसेप्शन काउंटर' या इंग्रजी शब्दाला मराठीत कुठेतरी स्वागतकक्ष असा शब्द वाचल्याचे आठवते. त्यावरून स्वागतकक्षात स्वागत करणारा म्हणून संस्कृत भाषेप्रमाणे उपपद तत्पुरुष समास करून 'रिसेप्शनिस्ट' या शब्दाला स्वागतक (पु.) किंवा स्वागतिका (स्त्री.) असा शब्द होऊ शकतो. 'जो रिसिव्ह करतो तो' अशा अर्थाने प्राप्तकर्ता हाही शब्द कसा वाटतो ते पहा.