वरील बहुतेक सगळे प्रतिसाद वाचले. मी आदिती शी सहमत आहे.
मोठ्या संख्येने कर्मचारी कपात हे सगळ्याच क्षेत्रात घडू शकते. मात्र, आय. टी. मध्ये काही घडल्यास त्याचा लगेच उलट सुलट अर्थ काढला जातो.
माझा अनुभव देते. माझा नवरा एका मोठ्या बहुराष्टीय कंपनीत आहे. ह्या वर्षी कंपनीला तोटा झाला. त्यात त्यांच्या व्यवस्थापनात सुध्धा बदल झाले. तरीही, गेल्या वर्षी ज्यांनी खरोखर चांगली कामगिरी केली होती, त्या सर्वाना कंपनीने भरीव पगारवाढ दिली. आणि जे, 'नॉन पर्फोमर' होते, त्यांना वॉर्निंग.
वर कोणी तरी म्हणाले आहे तसे, मिडीया ला काही तरी हवेच असते, बातमी म्हणुन.
जे उत्तम आहे, ते कायम टिकेलच.