तुम्हाला लिहावेसे वाटेल तेव्हा लिहा हो. विप्रो, इनफोसिस, कॉग्निझंट, परसिस्टंट, टीसीएस आदी कंपन्यांनी किंवा कुठल्याही बहुराष्ट्रीय कंपनीने 'मनोगतावर लिहू नये' असा कुठलाही आदेश अजूनतरी काढलेला नाही असे कळते. आगामी अखिल भारतीय साहित्यसंमेलनात आयटी कंपन्यांचे आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचे इंटरनेटच्या युगात मराठी साहित्याला योगदान ह्या विषयावर एक चर्चासत्र झाल्यास मात्र उपयुक्त ठरेल. काही कंपन्या हे चर्चासत्र प्रायोजित करण्यासाठी नक्कीच उत्सुक असतील.