अमिबा साहेब,
संगणकीय समस्येचे जरी व्यवहारात उदाहरण असले तरी तिच्यावरच्या उपायाचे उदाहरण बाहेरच्या जगात नाही. त्यामुळे हे सर्व स्मजून देणे आव्हानात्मक च आहे.
भाषा सोपी वापरल्याने समजायल खूप सोपे झाले आहे. मात्र सुरवातीला सोपी आणि क्रमाक्रमाने वाढती गुंतागुंत (अनेक लेखांत) दाखवता आली असती तर एकदा थोडे समजलेले पुढच्या गुंतागुंतीने अस्पष्ट होण्याचा धोका टळला असता.
मला ह्यातले जुजबी ज्ञान असल्याने आणि आवड असल्याने मजा आली वाचताना. पण अजिबात ज्ञान किंवा आवड नसलेल्याला आवड आणि रस कसा उत्पन्न करता येईल याचा(ही) विचार करावा. (अर्थात सगळ्यांना एकाच प्र्कारे आवडेल असे नाही.)
आणखी असे नक्की वाचायला आवडेल.