ह्या उत्तराच्या मागे काही कारणे असू शकतात...
मुलीच्या अपेक्षेपेक्षा काहीतरी कमी असेल तुमच्याकडे, पण तुम्ही अगदीच काही टाकाऊ नसाल, तर ती सरळ नकार द्यायच्या ऐवजी 'तसल्या नजरेचा' आधार घेते, कारण न जाणो जर तो स्वप्नांतला राजकुमार अवतरलाच नाही आणि वेळ निघून चालल्येय असं वाटायला लागल्यावर तुम्हाला नकार दिल्याचा पश्चात्ताप नको व्हायला... नजर काय बदलू शकते, पण एकदा नकार देऊन मन दुखवल्यावर ते सांधणं फार कठीण नाही का?
किंवा दुसरं कारण असं असू शकतं की, मुलीचा कोणी स्वप्नांतला राजकुमार तिला सापडलाय, पण घरच्या समाजाच्या किंवा इतर कुठल्या भितीमुळे जगाला सांगायला तयार नाहीये, पण तुम्हाला तर काहीतरी हो-नाही उत्तर द्यायलाच पाहिजे, म्हणू वेळ मारून न्यायला 'तसली नजर'... कारण खरं सांगायला(की माझा दुसरा कोणी जीवाचा जीवलग आहे) भिती वाटते...