वाटले चिलटास येते बाज होता
अधिक चांगले वाटते आहे खरे. पण कवीच्या मनात काय हेही बघावे लागेल. कदाचित चिलटाचे मानुषीकरणही केले असावे.


दोन  गोष्टी आहेत:

१.वाटले चिलटास येते बाज होता मध्ये थोडा शब्दक्रम गडबडतो. म्हणजे कसे की, वालटे चिलटास येते नंतर वाचक थांबतो आणि विचार करतो चिलटास काय येते? त्यामुळे चिलटास बाज होता येते असे वाटले हे लगेच कळत नाही.

शब्दक्रमामुळे अर्थ कसा बदलू शकतो हे सांगण्यासाठी उर्दूमधले एक उदाहरण द्यावेसे वाटते.
एक ओळ आहे: दिखाकर मदारी तमाशा गया
मदारी दाखवून तमाशा निघून गेला
असा एक अर्थ इथे काढता येतो.
मदारी तमाशा दिखाकर गया असे लिहिले तर. मदारी तमाशा दाखवून गेला असा सरळ अर्थ कळतो. तमाशा, मदारी, दिखाकर ह्या शब्दांची जागा बदलून बघितली की वेगवेगळे अर्थ लक्षात येऊ शकतात. कवीला किती अर्थ अभिप्रेत आहेत ह्यावर शब्दक्रम ठरत असतो, ठरवायला हवा असे मला वाटते.

२. कदाचित कवीला हिंदुस्तानी भाषेतला बाज हा शब्द तिथे अभिप्रेत असावा किंवा मराठीतला दुसरा बाजदेखील अपेक्षित असावा.

अवांतर:
छंदस हा शब्द मराठीत नाही. छांदस आहे. कदाचित कवीने 'छंदस' जाणूनबुजून वापरला असावा.