छंदाचा साचा, शब्दाचे वैभव आणि बाज ही सगळी सामग्री होती; पण आतला आवाज कुठे होता ... असा अर्थ आहे असे वाटले.
छंद+साचा आहे इथे
छंदसाचे केले असते तर गोंधळ कदाचित झाला नसता.
दुसऱ्या शब्दाशी असलेल्या साधर्म्यामुळे गोंधळ होईल असे नवीन शब्द घडवू नयेत. बरेचदा असे सहज प्रसूत न झाल्यासारखे वाटणारे नवीन शब्द गझलेत वापरले की गझलही घडवल्यासारखी आणि अवघडल्यासारखी वाटू शकते, असे मला वाटते.