या रचनेस आलेल्या प्रतिसादांची संख्या व त्यावर झालेली चर्चा बघून कृतकृत्य झालो. तुम्हा साऱ्यांचा मी अत्यंत आभारी आहे.

@महेश : 'चिलट' शब्द नपुंसकलिंगी आहे हा तुमचा आक्षेप मान्य आहे. परंतु चित्तंनी म्हटल्याप्रमाणे त्याचे मानुषीकरण करून कवीने हे स्वतःसाठी रूपक म्हणून वापरले आहे. (आणि 'चिलट' शब्द नपुंसकलिंगी असला तरी चिलटांमध्येही तो चिलट व ती चिलट असतातच की.     ) "वाटले चिलटास येते बाज होता" या तुम्ही सुचवलेल्या बदलाविषयी चित्त म्हणतात त्याप्रमाणे अर्थाच्या आकलनात गोंधळ होऊ शकतो.


"वाटले चिलटास तोही बाज़ होता" - या ओळीत बाया शब्दाचा अर्थ ससाणा असाच आहे.

छंदसाचा = छंदाचा साचा = वृत्त.  आधी 'छंदढाचा' हा सामासिक शब्द वापरणार होतो पण शेवटी छंदसाचा वापरला.