ह्यात आणखी एक दोष दिसतो. येथले होता हे रूप इतर स्थिरयमकांपेक्षा (रदीफ) वेगळे आहे. इतर ठिकाणी ते 'असणे' ह्याचा भूतकाळ आहे तर येथे 'होणे' अशा अर्थाने अव्यय आहे.

असे बदललेले स्थिरयमक गझलेच्या व्याकरणात बसते की नाही कुणास ठाऊक.

'स्थिरयमक' हा शब्द आवडला.  बदललेले स्थिरयमक/अन्त्ययमक ('असणे' ह्याचा भूतकाळ आणि 'होणे' अशा अर्थाने अव्यय) बहुधा जुन्या काळात वापरत नसत, असे वाटते. किंबहुना यमक म्हणून बहुधा विशेषणाऐवजी क्रियापदही चालत ((जसे: 'देखणे, 'वागणे') नसे, असे एका जाणकाराने सांगितल्याचे आठवते.  खातरजमा करून सांगीनच.