फर्निचर याचा अर्थ, घर किंवा एखादी जागा सजविण्यासाठी आरामदायी साधने. यासाठी मराठीत शब्द नसल्याने तो अभाषांतरणीय वाटतो पण त्यासाठी मराठीत पर्यायी शब्द निर्माण केला जाऊ शकतो.किंबहुना आता ज्या शब्दांना मराठी शब्द नाहीत ते नव्याने बनवायला हवेत. तशा दृष्टीने माझा हा प्रयत्न.

फर्निचर याचा अर्थ घर किंवा एखादी जागा सजविण्यासाठी आरामदायी साधने. संस्कृतमधील रम धातूपासून आराम किंवा विराम हे शब्द तयार होतात. दोन्ही शब्दंचा अर्थ विसावा असाच होतो. जे विसावा देतात किंवा इंद्रियांना आनंद देतात ते विरामदायी. त्यामुळे विरामदायी हा शब्द फर्निचरला वापरला जाऊ शकतो पण तो बराच मोठा वाटत असल्याने जसे सुखदायीला संक्षेपाने आपण सुखद म्हणतो तसे विरामदायीला विरामद म्हंटले तर काय हरकत आहे. म्हणून विरामद हा फर्निचरला पर्यायी मराठी शब्द मी सुचवत आहे.

एक संस्कृत वैय्याकरणी