निमिष, माफ करा पण आय.टी. क्षेत्रावर संकटाची गडद छाया म्हणजे नक्की काय? आपले हे विधान म्हणजे जग बुडी होणार आहे आणि आता फक्त अमेरिकाच जगाला वाचवू शकते. असा काहीसा प्रकार वाटतो आहे. तुम्ही नक्की कोणाच्या नजरेने संकट म्हणत आहात? मला तर हे काही भयंकर संकट वाटत नाही.  कृपया तुमचे म्हणणे जास्त स्पष्टीकरणांसहित लिहा. म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे ते लक्षात येईल. इथले काही प्रतिसाद वाचून त्यांच्यावर राज ठाकरे परिणाम (चांगला मुद्दा योग्य प्रकारे हाताळता येत असताना उगाचच एकदम आक्रमक होणे) वाटतो आहे.

माफ करा. पण चर्चेचे शीर्षक वाचून आता माहिती तंत्रज्ञान क्षेत्र हे अचानकपणे पृथ्वीतला वरून गायब होणार आणि तुम्ही त्याची जालवाणी (आकाशावाणी म्हणता येत नाही) करत आहात असे वाटते आहे. तसेच ऋषिकेश यांचा मुद्दा सुद्धा योग्य वाटतो आहे.