आता प्रश्न असा समोर उभा राहील की या सर्व कर्मचाऱ्यांचे काय? ज्यांनी आधी खुप कमावून घेतले असेल त्यांचे ठीक आहे पण ज्यांना खरोखर नोकरीची गरज आहे, ज्यांचे बस्तान अजून नीटसे बसलेले नाही त्यांचे काय होईल?
नेमका प्रश्न आहे हा. हे लक्षात घ्या की आयटी क्षेत्र हे काही समाजकल्याण म्हणून सुरू झालेले नाही. तो कुणाचा तरी दंदाच आहे. त्यात मागणी पुरवठा फायदा तोटा असाच विचार करायला हवा.
ज्यांची नोकरी गेलेली असेल त्यांनी यावरून धडा घेऊन नवे काहीतरी शिकून (ज्याला मागणी असेल ते) नवी सर्टिफिकिटे पदरात घेऊन जगभरच्या नोकऱ्यांना अर्ज करीत राहावे. कुठेतरी जॉब मिळेलच, हा विश्वास बाळगावा.
शिवाय नोकरी मिळाल्यावरही स्वस्थ राहू नये. सतत अर्ज करीत राहावे व चांगली मिळताच जुनी नोकरी सोडावी. आपण कुणाचे देणे घेणे लागत नाही हे लक्षात ठेवावे. (कारण एकदा ले ऑफ होऊन ते दिसले आहे)