निमिष,
तुम्ही चर्चा चांगल्या विषयावर सुरू केलीत. पण ती पुढे चालवितांना, मला तरी वाटते, तुम्ही काही प्रतिसाद खूप व्यक्तिगत स्वरूपात घेतलेत, तसे ते घेण्याची जरूरी नव्हती. चित्त ह्यांनी 'मनोगताचे काय' वगैरे लिहीले खरे, पण त्यानंतर त्यांनी हेही लिहीले आहेः
आयटी मजूर, कामगार कमी दरात उपलब्ध असल्यामुळे ('लेबर आर्बिट्राज'ला मराठीत काय म्हणायचे?) भारतात ह्या क्षेत्राची भरभराट झाली. सध्याची आणि येणारी तेवढी अनुकूल नाही, हे कळल्यामुळे त्यामुळेच टीसीएस आणि इतर काही कंपन्यांनी कामगार कपात करण्याचे ठरवले असावे, हे स्पष्टच आहे.
तसेच एकदा चर्चा सुरू केल्यावर ती थांबवायची असेल, तर तिचा चर्चाकाराने समारोप करावा. (तसे केल्यानंतरही ती बंद होईल, ह्याची खात्री नाही, पण नंतर तुम्ही हवे तर, दुर्लक्ष करू शकता).
हे एव्हढे सगळे लिहायचे कारण की, परत नव्या चर्चा, नवे लेख घेऊन अवश्य येथे या. चर्चा करतांना कधी कधी फाटे फुटणार, तरी आपण आपल्या मार्गावर राहिले म्हणजे पुरे.
कळावे,
प्रदीप