मेघनाद लिहितात त्यात तथ्य आहे. नुसताच मानसिक आधार नाही तर व्यवसायावर संपूर्ण मदार यशस्वीरीत्या टाकलेली मी पाहिलेली आहे.
आमचा एक शेजारी विख्यात अमेरिकी विद्यापीठाचा पीएचडी होता आणि मोठ्या कंपनीत संशोधनाचे काम करीत होता. (आयटी नव्हे) नोकरीतल्या प्रगतीची मर्यादा पाहून त्याने व्यवसायात उतरायचे ठरवले. आणि आता तो अमेरिकेत भारतीय किराणा भुसार मालाचे दुकान अतिशय यशस्वीरीत्या चालवीत आहे. एखाद्या आय टी व्यावसायिकाला हेवा वाटावा अशी त्याची स्थिती आहे.