श्रावण व अमिबा, चर्चा चांगली झाली आहे.

शेतकरी सेझला विरोध करणार हे अगदी समजण्यासारखे आहे. माझे एकुलते एक घर पाडून तिथे गावातल्या मुलांसाठी शाळा बांधायचे ठरले तर गावातल्या सगळ्या मुलांचा फायदा होणार हे निश्चित. पण मी असे होऊ देईन का? आपण रस्त्यावर येऊ अशी पक्की खात्री असल्यावर?

सरकार शेतकऱ्यांना गृहित धरते आहे. असंघटित व दुर्बळ घटक. किती विरोध करणार?

मला स्वतःला गांधीजींचे स्वयंपूर्ण गावाचे, कुटिरोद्योगांचे मॉडेल आवडते. पर्यावरणाशी शत्रुत्व न पत्करणारे. 'समृद्धी म्हणजे वेगाने चालणाऱ्या गाड्या आणि उंच इमारती नव्हे. कोक आणि मॅक तर नव्हेच नव्हे', वांगारी माथाई (Wangari Maathai) म्हणतात. आणि त्यांची समृद्धीची यादीही छोटी नाही. शुद्ध पाणी, शंभरेक माणसात एखादा डॉक्टर, प्रत्येकाला शिकण्याची संधी ...

एका ठिकाणी १०००० लोकांना काम देणारे कारखाने अशी समृद्धी आणणार नाहीत असे मला खात्रीने वाटते.